Tuesday, June 22, 2010

" गाय एक उपयुक्त पशु !"



मुसलमान जेव्हा हिंदुस्थानवर चालून आले तेव्हा त्यांच्यातील कित्येक लुच्च्या सेनापतींनी मुसलमानी सैन्यापुढे गायींच्या कळपांचे गोल रचून चाल केली. हिंदूंचे सैन्य त्यांवर उलट चालून जाताच ते हिंदुसैन्य अकस्मात थांबले. मागे मागे हटू लागले ! का? हिंदूंचे हाती शस्त्रास्त्रे नव्हती? ते रणात काटाकाटी करण्यास भ्याले म्हणून? नव्हे ! तर ती शस्त्रास्त्रे
देशशत्रूच्या सैन्यावर सोडली तर प्रथम गायींचे पुढे असलेले कळपच मरतील म्हणून ! म्हणून हिंदू सैन्याने शस्त्रास्त्रे उपसण्यास साफ नाकारले ! गायी मरू नयेत म्हणून राष्ट्र मरू दिले !!!! गोवध हे महापाप. सोशिकपणा त्यांच्या हाडीमासी खिळलेला. पण देशशत्रुची नि धर्मशत्रुची आततायी चढाई रोखणे हेच महापुण्य, ही शिकवण त्यांस उत्कटत्वाने कोणी दिलेली नव्हती.
पंचगव्य हा संस्कृत शब्द आपणांस ब्रह्मज्ञान शब्दासारखाच पवित्र वाटतो
. मासेमाऱ्या कोळ्यांचे घरात माशांची दुर्गंधी सवयीने मुळीच येत नाही, पण इतरांस त्या आळीत पाय टाकताच नाक दाबून धरावे लागते. तसेच हिंदू तत्त्वज्ञानाने भारलेल्या त्या अमेरिकनादी प्रगत लोकांस हिंदू धर्माची दीक्षा देण्यासाठी गंभीरतेने बसवून आम्ही त्या दीक्षेचा पहिला विधी म्हणून जर त्यांस त्यांच्या डोळ्यांसमक्ष गायीची मुत्र नि शेण कालवून ते प्या म्हणून सांगितले, तर त्यांस आमच्या तर त्यास आमच्या धार्मिक हिंदू आचाराची इतकी किळस येईल की, शेण खाण्यानेच जो धर्म स्वीकारता येतो त्याचे तोंड देखील ते पाहू इच्छिणार नाहीत !!!!!!
खरोखर हा किळसवाणा प्रकार निदान परधर्मातील लोकांच्या हिंदुकरणाचे संस्कारांत तरी आढळता कामा नये. फार तर तुळशीपत्र खावे. शेण खाणे ही शिवी आहे, संस्कार नव्हे !!!
काहींचे म्हणणे असे की, 'गायीच्या शेणात नि गोमुत्रात तसेच काही रोगपरीहारक नि 'पौष्टिक' गुण आहेत !!!! म्हणून आमच्या त्रिकालज्ञानी स्मृतिकारांनी ते शेण खावे नि गोमुत्र प्यावे म्हणून सांगितले !' ज्या रोगांवर तो रामबाण उपाय ठरेल त्या रोगाचे वेळी ते खुशाल प्या. गोमुतात म्हणे औषधी गुण आहेत
! पण ते नाही कशात ? नास्तिमूलमनौषधम !! गोमुत्रात काही गुण आहेत तसे ते नृमूत्रातही आहेत ! बंदिगृहात जे अट्टल सोदे असतात त्यांना जेव्हा कळते की, आपणास फटक्यांची शिक्षा होणार तेव्हा ते आपल्या कोठडीत बंद असता पहाटेच स्वतःचे मूत्र गटगट पितात ! कारण, त्याचा गुण ते स्वानुभवाने सांगतात की, त्याच्या पिण्याने अंग बधीर होते नि फटक्यांच्या वेदना फार कमी होतात !!! म्हणून ते संस्कारांत प्यायचे काय? ब्र्यांडी कफ क्षयादी विकारावर औषध आहे, म्हणून तिचीही आचमने घ्यायची ?
अहो पण शिवाजी महाराजही स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणवीत !
गो प्रतिपालन हे आमची एक राष्ट्रीय कर्त्यवच आहे. पण शत्रूकडील गायी मारणे पाप समजून, गाय ही अवध्य यासाठी हत्यार टाकून राष्ट्राचा घात करण्याइतकी महाराजांची गोभक्ती बोकाळती तर तीही राष्ट्रद्रोहच ठरती ! पण त्या महापुरुषाने पितृभक्ति देखील राष्ट्रभक्तीच्या खालीच गणली,
तिथे गोभक्तीचे काय ?
महाराज बैलगाडीत बसत म्हणून आज आगगाडीत बसावयाचे नाही की काय? महाराज कंबरेस भवानी लटकावीत, डोक्यास पोलादि शिरस्त्राण, हाती वाघनखे मग तुम्ही डोक्यात कानटोप्या नि हाती जपमाळा का धरल्या ? महाराजांच्या गोब्राह्मणप्रतिपालनाच्या ब्रीदाप्रमाणेच आणखी म्लेंच्छहननाच्या ब्रीदाविषयी या मंडळींत गोष्ट काढून बघा कसे थरकापतात !
गाय हा पशु उपयुक्त आहे म्हणून रक्षणीय आहे. गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून, त्यास आर्थिक स्वरूप दिले कि झाले. हिंदूंच्या गोभक्तीत कृतज्ञता, दया, जीवैक्यबुद्धि इ. सदगुणांचा अतितेक आहे. पण गोघ्न अहिंदूंच्या गोहत्येत क्रुरपणा, कृतघ्नपणा आणि आसुरी जीवनहत्या इ. दुर्गुणांचा अतिरेक आहे तो धार्मिक खुळेपणाच नव्हे, पण अधार्मिक दुष्टपणाही आहे. ह्यास्तव त्या अहिंदूंनीही तो धार्मिक ’गोद्वेष’ सोडून देऊन आर्थिक द्रुष्टीचे गोरक्षण हेच कर्तव्य समजावे.
(समग्र सावरकर खंड ८ मधून साभार)
स्वा. सावरकर युवक संघटना , हिन्दुस्थान !!



लेखासाठी सहाय्य स्वाती सारंग !!

2 comments:

  1. अतिशय चागले विचार । जानवर प्रेमा पेक्षा धर्म सेवा करा । जानवर ते जानवर । येथे किसान आत्महत्या करतात आर्थिक तंगी मुळे त्या गाय पालने त्यास परवडत नाही

    ReplyDelete
  2. अतिशय चागले विचार । जानवर प्रेमा पेक्षा धर्म सेवा करा । जानवर ते जानवर । येथे किसान आत्महत्या करतात आर्थिक तंगी मुळे त्या गाय पालने त्यास परवडत नाही

    ReplyDelete